24 September, 2016

आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी आवाहन
          हिंगोली, दि. 24 :- नामांकीत निवासी इंग्रजी शाळा प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन जिल्हयातील (परभणी व हिंगोली ) सर्व पालकांना सुचित करण्यात येते की, इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये दरवर्षी या कार्यालयामार्फत प्रवेश देण्यात येतात. मात्र त्याकरीता खालील प्रमाणे अटी व शर्ती आहेत.
1) पालकांचे उत्पन्न्‍ प्रमाणपत्र (1 लाखापेक्षा कमी), 2) पालक शासकीय नोकरीत नसल्याचे प्रमाणपत्र 3) पालकाचे जातीचे प्रमाणपत्र, 4) जन्माचा दाखला / शाळा शिकत असल्याचा दाखला, 5) वैद्यकीय प्रमाणपत्र.  या सर्व बाबींची पुर्तता झाल्यासच विद्यार्थी पात्र होतो. वरील प्रमाणपत्र चुकीचे आढळुन आल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही पालकांनी परस्पर विध्यार्थ्याना शाळेत प्रवेशित करू नये. तसेच सर्व शाळांना सुचित करण्यात येते की, त्यांनी विद्यार्थी परस्पर कार्यालयाच्या आदेशाविना प्रवेशित करु नये, तसे केल्यास सदर विद्यार्थ्याची संपुर्ण जबाबदारी शाळेची राहील, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: