सार्वजनिक ग्रंथालयासाठी कार्यशाळेचे आयोजन
हिंगोली, दि. 2 :- राजा
राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाताअंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य
योजनेतून ग्रंथालयांसाठी राबविण्यात येणाऱ्या समान व असमान अर्थसहाय्याच्या विविध
योजनांची व ग्रंथालय संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची सार्वजनिक
ग्रंथालयांना माहिती देण्यासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा
आयोजित करण्यात आली आहे . सदर कार्यशाळा दिनांक 7 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 9-00
ते दुपारी 4-00 या वेळेत कल्याण मंडपम् , नगर परिषद, हिंगोली येथे आयोजित करण्यात
आली आहे. सदरील कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते होणार
आहे.
या कार्यक्रमासाठी
औरंगाबाद विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अ. मा.
गाडेकर, विशेष अतिथी म्हणून क्षेत्रिय अधिकारी (पश्चिम विभाग) राजा राममोहन रॉय
ग्रंथालय प्रतिष्ठानचे अनंत वाघ , जिल्हा कोषागार अधिकारी टि. एल. भिसे, नगर
परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी सु.सं. हुसे,
जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक आदी उपस्थित राहणार आहेत, असे
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष धों. साबळे यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment