चौकशी अधिकारी नामतालिकेसाठी अर्जाची मागणी
हिंगोली, दि. 22 :- महाराष्ट्र
सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी / प्राधिकृत अधिकारी
यांची नामतालिक (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून निवृत्त झालेले अधिकारी
(वयाची 65 वर्ष पूर्ण न झालेल्या ), निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टड अकौंटंट
यांच्याकडून मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे
विहीत नमुने विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था, औरंगाबाद , जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, हिंगोली , सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था ता. हिंगोली / वसमत/
कळमनुरी/सेनगांव/ औंढा (ना) या कार्यालयात दिनांक 19 सप्टेंबर, 2016 ते 20
ऑक्टोंबर, 2016 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहीर सूचना
उपरोक्त नमूद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तसेच
संबंधितांनी सदरील अर्ज विहीत नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 29
ऑक्टोंबर, 2016 पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांच्या
कार्यालयामार्फत सादर करावेत, असे सहकारी संस्था, हिंगोली जिल्हा उपनिबंधक यांनी
एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment