नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
हिंगोली, दि. 24 :-
येथील
जिल्हाधिकारी श्री. अनिल भंडारी यांनी जिल्ह्यात 48 तासात बहुतांश ठिकाणी
अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सावधगिरीची सुचना
दिल्या आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी / नागरिक यांना खालील खबरदारी घेण्याबाबत
कळविले आहे.
विशेषत: शेतकऱ्यांनी विजांचा
कडकडाट होत असतांना शेतीचे काम करु नये. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरीत करावे व स्वत: सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ जाऊ नये.
तसेच आपल्या मुलांना जलसाठ्याजवळ पोहण्यासाठी पाठवू नये. ( शाळा महाविद्यालयातील
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सुचित करावे.) पुलावरुन पाणी वाहत
असतांना कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये.
*****
No comments:
Post a Comment