16 September, 2016

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 20 व 22 प्रमाणे
 कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
हिंगोली, दि. 16 :- जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर, 2016 रोजीच्या आयोजित मराठा मुकमोर्चा बाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी यांची खालील प्रमाणे नियुक्ती करण्यात येत आहे.
ठिकाण व नियुक्त केलेल्या कार्यकारी दंडाधिकारी यांचे नांव :- 1) जिल्हा परिषद मैदान - श्री. अवधाने, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, हिंगोली. 2) मोर्चा सोबत :- 1) श्री. मदनुरकर, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, औंढा व 2) श्री. बोथीकर नायब तहसिलदार, हिंगोली, 3) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर - श्री. अमित शेंडगे, उपविभागीय अधिकारी, हिंगोली, 4) शहरात - श्रीमती नांदे, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, वसमत, 5) पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली येथे राखीव - श्रीमती गोरे, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, कळमनुरी.
उपरोक्त प्रमाणे नियुक्त केलेल्या दंडाधिकारी यांना त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दी पावेतो दि. 17 सप्टेंबर, 2016 रोजी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

No comments: