20 September, 2016

अवैध दारुबाबत आता व्हॉट्सॲपवर तक्रार करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 20 :- जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध दारुबाबत तक्रार देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने व्हॉट्सॲप सुविधा सुरू केलेली आहे. त्यानूसार 8422001133 या क्रमांकावर राज्यभरातून कोणालाही तक्रार करता येईल. या व्हॉट्सॲप नंबरवर केलेली तक्रारींची नोंद आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई या कार्यालयात होणार आहे व वरिष्ठ पातळीवर आपल्या तक्रारींची दखल घेतली जाणार असून तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. तरी आपल्या परिसरातील अवैध दारु धंदे, निर्मिती, विक्री केंद्रे तसेच बनावट मद्य, कमी प्रतीचे मद्य, मद्यार्क, मळी व इतर राज्यातील कर बुडविलेले मद्य इत्यादी बाबतची तक्रार असल्यास वरील व्हॉट्सॲप नंबरवर नागरिकांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: