03 September, 2016

राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य मंत्री
श्री. विजय शिवतारे यांचा सुधारित हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली, दि. 3 :- राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे दिनांक               4 सप्टेंबर, 2016 रोजी सुधारित हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.   
रविवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2016 सकाळी 7-28 वाजता परभणी येथे आगमन व सकाळी 7-30 ते 8-30 वाजतेपर्यंत शासकीय विश्रामगृह, परभणी येथे राखीव. 8-30 वाजता परभणी येथून हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण. 9-00 ते 9-30 वाजता औंढा नागनाथ जि. हिंगोली येथेील शिवसेना पक्ष लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत हिंगोली जिल्हा पाहणी दौऱ्यासंदर्भात नियोजन बैठकीस उपस्थिती. 10-00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव . 10-00 ते 2-00 वाजता हिंगोली तालुक्यातील गावांना भेटी व ग्रामस्थांची चर्चा. दुपारी 2-30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा दुष्काळग्रस्त परिस्थितीवर उपाययोजना व सध्याची पीकपाहणी परिस्थिती आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील पत्रकार परिषदेस उपस्थिती. सांयकाळी 5-00 वाजता हिंगोली येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण. सांयकाळी 7-30वाजता देवगिरी एक्सप्रेसने परभणी येथून मुंबईकडे प्रयाण करतील.
**** 






No comments: