29 September, 2016

सन 2016-2017 शिष्यवृत्ती मंजूरीकरिता 
महाविद्यालयानी अर्ज सादर करावीत
--- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण

          हिंगोली, दि. 29 :-  सन 2015-2016 चे अपात्र त्रुटीची पूर्तता करुन अर्जाच्या मुळ प्रती फेर सादर करणे. तसेच ऑनलाईन अर्ज, सन 2016-2017 करीता महाविद्यालयातील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती करीता नवीन अर्ज भरणे तसेच जुन्या विद्यार्थ्यांचे अर्ज नुतणीकरण करणे. प्राचार्यांची डिजीटल सिग्नेचर केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे. महाविद्यालयास आजपर्यंत (सन 2016-2017 सह) असलेल्या शासन मान्यतेच्या प्रती आणि विद्यापीठ संलग्नीकरणाच्या प्रती सादर करावी. सन 2016-2017 करीता प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी लिंक झाल्याचे बँकेचे प्रमाणपत्र सादर करावीत. सन 2016-2017 करीता नवीन अर्ज भरणे व अर्जाचे नुतणीकरण करणे. सन 2016-2017 चे फिस स्ट्रक्चर शिक्षण मंडळ, विद्यापीठ किंवा शिक्षण शुल्क समितीच्या आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राच्या आवश्यक प्रतीसह सादर करुन ऑनलाईन फिस स्ट्रक्चर भरणे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्जांच्या मुळ प्रती आवश्यकता त्या कागदपत्रासह बी स्टेटमेंटनुसार सादर करावीत.
            उपरोक्त कार्यवाही केल्याशिवाय सन 2016-2017 मध्ये कोणत्याही महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मंजूर होणार नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यलयाचे प्राचार्य यांची राहील, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी कळविले आहे.   

***** 

No comments: