11 July, 2017

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन संपन्न
  • 11 ते 24 जुलै लोकसंख्या पंधरवाडा

हिंगोली, दि. 11 : जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 2017  म्हणुन या वर्षीसुध्दा साजरा करायचा आहे.या वर्षी हा कार्यक्रम केद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थेत साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी आयोजित करावयाच्या कार्यक्रमाचे घोषवाक्य ‘जोडप्यांनी जबाबदारी स्विकारा, कुटुंब नियोजनाचा अवलंब करा’ असे आहे. सदर कार्यक्रमाचा जनजागृती करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल पतंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी,  निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. सतिष रुणवाल, साथरोग वैद्यकिय अधिकारी डॉ.गणेश जोगदंड तसेच जि.प.कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते.
11 जुलै 2017 हा जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त  जिल्ह्यातील प्रा. आ. केंद्र, ग्रामीण रुग्णालय,  उप जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया शिबीरे आयोजित करण्यात येत आहे. त्याचा सर्व योग्य  जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच पाळणा लांबविण्यासाठी तांबी या पध्दतीचा अवलंब केला जातो यासाठी वरिल आरोग्य संस्थेत तांबीचे शिबीरे लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा 11 जुलै ते 24 जुलै या कालावधीत होणार आहे. तसेच तांबी या पध्दतीत सुधारणा होवुन प्रसुती पश्चात 24 तासाच्या आत  तांबी (PPIUCD) बसविण्यात येणार आहे.
            तसेच मुलीचे 19 व मुलाचे  21 वर्ष वय पुर्ण झाल्यानंतर लग्न करावे शास्त्रीयदृष्टया चांगले आहे कारण लवकर लग्न केल्यास माता मृत्यु व कुपोषण व बाल मुत्युचे प्रमाण वाढते. तसेच  लोकसंख्या नियंत्रण करणेसाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा. आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ठेऊन अतिसारावर प्रतिबंधात्मक उपाय करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
            सदर कार्यक्रम यशस्वीसाठी के. ए. ईशी, श्री तुपकरी, यु. एल. थिटटे, एस. एम. नरोटे, श्री पारडकर, श्री तावडे , श्री गारुडी, राहुल मोरे, श्री बोरकर, श्रीमती बेले व इतर कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

                                                                        *****

No comments: