जिल्हा नियोजन समितीवर
निवडणूकीने निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी मतदार यादी
हिंगोली, दि. 10 :
जिल्हा नियोजन समितीवर निवडणूकीने निवडून
द्यावयाच्या सदस्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, नगर
पालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्य क्षेत्रामधून निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी
सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगर पालिका व नगर पंचायत सदस्यांची यादी सर्व तहसिल, नगर
पालिका, नगर पंचायत व पंचायत समितीमध्ये डकविण्यात आली आहे.
ग्रामीण निर्वाचन क्षेत्र आणि लहान नागरी निर्वाचन क्षेत्र सदस्यांसाठी
मतदार यादीत काही हरकत, भूल आणि चूक निदर्शनास आल्यास आपण व्यक्तीश: खालील ठिकाणी
योग्य पुराव्यासह यादी प्रसिध्द झाल्यापासून दि. 13 जुलै, 2017 रोजीच्या सायंकाळी
5.00 वाजेपर्यंत ग्रामीण क्षेत्र – उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी
कार्यालय, हिंगोली आणि नागरी क्षेत्र – जिल्हा प्रशासन अधिकारी (नपाप्र)
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे नोंदवावे. अशा नोंदविलेल्या आक्षेपांबाबत
अभिलेख तपासून योग्य दुरूस्ती करण्याचे अंतिम अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे.
*****
No comments:
Post a Comment