17 July, 2017

अपंग व्यक्तींनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी 21 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 17 :  भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी सन 2017 मध्ये देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी खालील प्रवर्गातील पुरस्कारासाठीचे अर्ज मागविण्यात येत आहे. या अर्जांमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अपंग कर्मचारी (स्वयंरोजगारासह) त्याचे नियुक्तक व सेवायोजन अधिकारी यांना दिल्या जाणाऱ्या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.
            उत्कृष्ट कर्मचारी -स्वयंउद्योजक अपंग व्यक्ती, उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजन अधिकारी संस्था, अपंग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रथित यश व्यक्ती, अपंग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने केलेले उत्कृष्ट संशोधन / उत्पादन / निर्मिती, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणारे कार्यालय / संस्था, अपंग व्यक्तींना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा, राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाचे कार्य करणारी राज्य संस्था, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रौढ अपंग व्यक्ती, उत्कृष्ट कार्य करणारे अपंग बालक, उत्कृष्ट ब्रेल छापखाना, उत्कृष्ट सहज साध्य संकेतस्थळ, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहीत करणारे उत्कृष्ट राज्य, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी अपंग व्यक्ती. या पुरस्काराची माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या www.socialjustice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरलेले अर्ज या कार्यालयास दि. 21 जुलै, 2017 रोजीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****  

No comments: