मौजे वगरवाडी सर्वे क्र.25 व
29 क्षेत्र गोळीबार सरावासाठी उपलब्ध
हिंगोली, दि. 4
: समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 यांनी
या गटास पोलीस कर्मचारी यांचे ड्रिल, गॅस ॲम्युनेशन, 7.62 एमएम एकेएम, एलएमजी,
5.56 एमएम इंसास, एलएमजी, स्टेस मॅनेजमेंट सत्र क्र. 11 व 12 चे वार्षिक गोळीबार सराव
दि. 3, 4, 5, 15, 29 जुलै, 2017 व दि. 5, 12, 19, 26, 30 ऑगस्ट, 2017 या कालावधीत घेण्यात
येणार आहे. उपलब्ध असलेले गोळीबार सरावाकरिता मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29
मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये
व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा
ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत
आहे, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत असून
सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये,
अशा सूचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व
संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे
वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी
करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.
*****
No comments:
Post a Comment