12 July, 2017

पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 12 : सन 2017-18 मध्ये नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत लक्षांक प्राप्त झाले असुन 6/4/2 संकरीत गायी / म्हशी दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, अंशत ठाणबंद पध्दतीने शेळी पालनासाठी 10+1 शेळी / मेंढी गट पुरवठा करणे. तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कुटपालन व्यवसाय करणे या योजनेसाठी अर्ज  स्विकारण्यात  येत आहेत.
अधिक माहितीसाठी व अर्ज मिळणेसाठी नजिकच्या पशुवैद्यकिय संस्थेस संपर्क करावा तसेच परिपुर्ण अर्ज भरून दि. 9 ऑगस्ट, 2017 पर्यत नजीकच्या पशुवैद्यकिय संस्थेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. ए. बी. लोणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                            *****


No comments: