पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा स्वयंचलित वेधशाळेचे ई-भूमीपुजन
हिंगोली, दि. 7 :
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
कार्यक्रम जागतिक बँक जलस्वराज्य-2 या उपक्रमातर्गत जिल्हास्तरावर उभारण्यात येणाऱ्या
पाणी गुणवत्ता प्रयोग शाळेचे तसेच स्वयंचलित वेधशाळेचे ई-भूमीपुजन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या शुभ हस्ते दि. 10 जुलै, 2017 रोजी दु. 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
एनआयसी विभागात करण्याचे निश्चित करण्यात आले
आहे.
वन
वे ब्रॉडकास्टिंग व्दारे ई-भूमीपुजन करण्यात हिंगोली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रयोगशाळा
ई-भूमीपुजन कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार इतर सन्माननीय
लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर
संबंधित सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी राहणार आहेत.
*****
No comments:
Post a Comment