13 July, 2017

 हिंगोली प्रादेशिक नियोजन मंडळाची बैठक
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या उपस्थितीत संपन्न  
 हिंगोली, दि. 13 :- प्रादेशिक नियोजन समितीच्या अहवालावर निर्णय घेणे व हिंगोली प्रदेशाची प्रादेशिक योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 15 (1) व 16 (4) अन्वये शासनाकडे अंतिम मंजूरीसाठी सादर करण्याकरिता हिंगोली प्रादेशिक नियोजन मंडळाची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, नगर परिषदेचे अध्यक्ष बाबाराव बांगर, नगर रचना औरंगाबाद विभागाचे नगर रचनाकार दि.व्य. कुलकर्णी, प्रादेशिक प्रमुख , महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, औरंगाबाद यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे, अधीक्षक अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेडचे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक जी. एम. पवार, प्रादेशिक नियोजन मंडळ तथा सहाय्यक संचालक , नगर रचना सु. ल. कमठाणे, भुमिअभिलेख , जिल्हा अधीक्षक तु. आ. पेन्दोर आदी विभागाचे कार्यालय प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
बैठकीत हिंगोली जिल्ह्याची प्रादेशिक योजना संदर्भात प्रस्तावित जमिन वापर नकाशाचे प्रसिध्दीकरण, प्राप्त आक्षेप, आक्षेपांची सुनावणी, नियोजन समितीचा अहवालाची माहिती नगर रचना सहाय्यक संचालक सु.ल. कमठाणे यांनी पॉवर पाँईट प्रझेटेशनद्वारे सादर केली.
*****









No comments: