ऑगस्ट महिन्यासाठी 273.09 क्विंटलचे
साखर नियतन मंजुर
हिंगोली, दि. 20 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय कुटूंबांना प्रति
शिधापत्रिकाधारकांसाठी माहे ऑगस्ट - 2017 या महिन्याकरीता साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा
अधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
या नियतनानुसार प्रती शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. त्यानुसार
तालुक्याचे नाव, गोदामाचे नाव आणि
नियतन खालील प्रमाणे गोडावुन निहाय साखरेचे नियतन मंजुर केले आहे. (सर्व आकडे क्विंटलमध्ये)
हिंगोली, शासकीय गोदाम, हिंगोली - 73.09, औंढा नागनाथ, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित
) - 35, सेनगाव, शासकीय गोदाम, हिंगोली ( स्थित ) - 58, कळमनुरी, तहसिल कार्यालय जवळ
शासकीय गोदाम, कळमनुरी - 57, वसमत, शासकीय गोदाम, वसमत - 50 असे एकूण 273.09 क्विंटल
साखरेचे नियतन मंजुर करण्यात आले आहे. सर्व बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल
करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment