आयटीआय येथील भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 12 :
एम.आय.डी.सी. , लिंबाळा, येथील औद्योगीक
प्रशिक्षण संस्थेमध्ये दि. 18 जुलै, 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता रेमन्ड लक्सरी,
कॉटन लिमिटेड, अमरावती तर्फे भव्य भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
या
भरतीसाठी उमेदवार हा दोन वर्षे कालावधीचा आय. टी. आय. चा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे. कंपनी तर्फे निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षे ट्रेनिंग देण्यात
येणार असून प्रशिक्षण कालावधीमध्ये 5 हजार 700 शिकाऊ उमेदवारी वेतन देण्यात येईल.
त्यानंतर संबंधितांना आवश्यकतेनुसार तेथेच नौकरीमध्ये कायम करण्यात येईल. भरती
प्रक्रिया चार भागामध्ये विभागण्यात आली असून उमेदवारांची शारिरीक चाचणी यामध्ये
उंची 165 से. मी. कमीत कमी वजन 45 किलो, लेखी चाचणी, तांत्रिक चाचणी व मुलाखत
घेण्यात येईल. तसेच उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत-जास्त 24 वर्षे असावे.
इच्छूक
उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक कागदपत्रासह स्व-खर्चाने भरती मेळाव्यास हजर राहावे,
असे आवाहन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. पी. भगत, प्र. गटनिदेशक एस.
एम. राका, शिल्पनिदेशक यु. आर. बिहाऊत, ए. बी. भुसारे, कु. ए. डी. रावते यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment