4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
हिंगोली,दि.7:- (दि.07/07/2017) महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय महसुल व वनविभाग, सा.व.वि.2016/प्र.क्र.80/फ-11/दि.10 ऑक्टोबर 2016 नुसार संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलै ते 7 जुलै 2017 दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानुसार हिंगोली जिल्हयातील वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी होणेसाठी मा.जिल्हाधिकारी श्री.अनिलजी भंडारी व विभागीय वन अधिकारी श्री.केशव वाबळे यांनी प्रत्येक महिण्यात विभागप्रमुख यांच्या बैठका घेऊन कार्यक्रमाला गती देण्याचे काम केले.
हिंगोली जिल्ह्याचा वृक्षलागवड नियोजन आराखडा विभागप्रमुख यांच्या अहवालानुसार तयार करण्यात आला. हिंगोली जिल्हयाचे एकुण वृक्षलागवड उद्दिष्ट 7.66 लक्ष ठरविण्यात आले होते. तसेच 20 रोपवाटिकामध्ये 16.45 लक्ष रोपे तयार करण्यात आले. वृक्षलागवड करण्याच्या दृष्टीने वृत्तपत्र , पोस्टर्स, वृक्षदिंडी, इलेक्ट्रानिक मीडीया, पॉम्पलेट इ. व्दारे जनजागृती करण्यात आली. जिल्हयामध्ये पाच तालुक्याच्या ठिकाणी रोपे आपल्या दारी रोपे विक्री केंद्र उभारण्यात येऊन नागरिकांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करुन देण्यात आले.
नियोजनानुसार दिनांक
01 जुलै 2017 रोजी मा.नामदार श्री.दिलीपराव कांबळे पालकमंत्री हिंगोली यांचे शुभहस्ते स्व.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान एस.आर.पी.एफ कॅम्प येथे वृक्ष लागवड करुन जिल्हयातील वृक्षलागवड कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी स्थानिक आ. मा. श्री. तान्हाजीराव मुटकुळे, मा. आ. श्री. रामरावजी वडकुते, मा.आ. श्री. जयप्रकाश मुंदडा, जि.प.अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे व जिल्हाधिकारी श्री.अनिल भंडारी जिल्हाप्रमुख, शालेय विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थीत होते.
जिल्ह्यात शासकीय विभाग, नागरिक, लोकप्रतिनिधी व विद्यार्थी इत्यादी यांचे हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. वनविभागमार्फत विविध ठिकाणी वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये मौ. दुधाळा रोपवनामध्ये मा. आ.श्री.संतोष टारफे यांचे हस्ते रोप लागवड कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे मौ. डोणवाडा येथे मा.आ.श्री जयप्रकाश मुंदडा यांचे हस्ते रोपवनात रोपलागवड करुन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मौ.भाटेगांव येथील रोपवनात मा.खा.श्री. राजीव सातव व मा.आ.श्री. संतोष टारफे यांचे हस्ते वृक्षरोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
वनविभागा मार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना प्रत्येकी 364 रोपे मोफत पुरवठा करण्यात आली. तसेच रोप आपल्या दारी च्या माध्यमातुन लोकांसाठी विविध ठिकाणी स्टॅाल लावुन रोपे माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली. त्याच प्रमाणे ग्रीन आर्मी नोंदणी करुन वृक्षलागवड कार्यक्रमात लोकासहभाग मोठया प्रमाणात घेण्यात आला.
--- 2 ---
हिंगोली जिल्ह्यासाठी एकुण उद्दिष्ट 766850 इतके होते. त्यामध्ये एकुण - 1122 वृक्षलागवड स्थळावर खड्डे खोदण्यात आले. जिल्ह्यात उद्दिष्ट पेक्षा जास्त 2,39,099 इतके रोप लागवड करण्यात आली. त्यामुळे जिल्हयाचे एकुण साध्य 10,64,931 इतके झाले. त्यापैकी 10,05,949 ऑनलाईन उदिष्ट साध्य झाले यामध्ये वनविभाग 601575, सामाजिक वनिकरण विभाग -85125 इतर विभाग 3,19,249 इ. या प्रमाणे रोपलागवड करण्यात आली. ऑफलाईन साध्य उद्दिष्ट 58982, ऑनलाईन लोकसहभाग 26,195 इतका आहे. या प्रमाणे हिंगोली जिल्हयात वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय विद्यार्थी, शेतकरी, वृक्षप्रेमी, विभाग प्रमुख , अशासकीय संस्था, लोकप्रतिनिधी व वनकर्मचारी इत्यादीनी सहभाग घेतला.
वृक्षलागवडी मध्ये हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था, शालेय विद्यार्थी, पत्रकार बंधु, शेतकरी व सर्व वृक्षप्रेमी समाजबांधवाचे मनपुर्वक आभार. तसचे वृक्ष संगोपनासाठी सर्वांना शुभेच्छा.
***
No comments:
Post a Comment