13 July, 2017

महिला व बाल विकास विभागाची दत्तक नियमन ची बैठक संपन्न

हिंगोली, दि. 13 : दत्तक नियमन 2017 या विषयावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12 जुलै, 2017 रोजी महिला व बाल विकास विभागाची दत्तक नियमन 2017 ची बैठक संपन्न झाली.
 या बैठकीस रोहयो उपजिल्हाधिकारी के. ए. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम. आर. गालफाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. पी. कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. आर. रुनवाल व बाल कल्याण समिती हिंगोली हे उपस्थित होते. 
दत्तक नियमन 2017 अन्वये मुल जर दत्तक साठी मुक्त केले असल्यास त्याबाबत करावयाच्या कार्यपध्दती बाबत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्हा स्तरावर काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या बाबतीत काम करण्यासाठी बाल कल्याण समिती कार्यरत असुन हिंगोली येथे बाल कल्याण समिती अध्यक्ष सौ.वंदना सोवितकर, सदस्य ॲड. अनिल इंगोले, सदस्य ए.बी.लोणकर हे त्याबाबत काम करतात. ज्युवेनाईल जस्टीस केअर ॲड प्रोटेक्शन ॲक्ट 2015 नुसार ज्या मुलांना काळजी व संरक्षणाची गरज आहे एक पालक अथवा कैदयांची मुले अशा मुलांचे प्रवेश बाल कल्याण समिती मार्फत संस्थेत केले जातात या संस्थेकडुन मुलांचे काळजी व संरक्षण तसेच त्यांच्या शिक्षण, आरोग्य, निवास इ. बाबत सर्व सोयी पुरविल्या जातात. या मुलांपैकी अथवा इतर पिडीत महिलांना आपले मुल दत्तक द्यावयाचे असल्यास तसे बाल कल्याण समितीला कळविल्यास मुल कायदेशिरपणे दत्तक देण्याच्या दृष्टीने ते मुल दत्तक साठी मुक्त केले जाते. त्यानुसार त्या मुलांची आवश्यक माहिती ऑनलाईनवर उपलब्ध करुन दिली जाते. मुल दत्तक घेऊ इच्छीणारे पालक त्यातुन मुल दत्तक  घेऊ शकतात तसेच आवश्यक ती प्रक्रिया करून संबंधित मुल हे दत्तक दिले जाते ही सर्व प्रक्रिया ज्युवेनाईल जस्टीस केअर ॲड प्रोटेक्शन ॲक्ट 2015 व दत्तक नियमन 2017 नुसार पुर्ण केली जाते. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या बैठकीत या सर्व प्रकियेबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.

*****

No comments: