परिवहन विभागाची 14 जुलैपासून नवीन सारथी 4.0 प्रणाली
कार्यान्वित होणार
हिंगोली, दि. 13 : नवीन लायसन्ससाठी सारथी 1.0 ही प्रणाली बंद होऊन
सारथी 4.0 नवीन प्रणाली दि. 14 जुलै, 2017 पासून सुरू होत आहे. तसेच वाहन नोंदणी,
वाहन हस्तांतरण व इतर अनुषंगिक कामे ही वाहन 1.0 या प्रणाली बंद करून वाहन 4.0 ही
नवीन प्रणाली दि. 15 जुलै, 2017 पासून सुरू होत आहे.
नवीन
शिकाऊ लायसन्स अर्जासाठी नागरिकांनी sarathi.nic.in
या वेबसाईट ऐवजी parivahan.gov.in या वेबसाईटचा वापर करावा,
असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment