04 July, 2017

हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 अंतर्गत
 जिल्हास्तरावर हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती
हिंगोली, दि. 4 :  हुंड्यासारखी सामाजिक समस्या आजही ज्वलंत आहे. हुंडा देणे व घेणे परंपरेने अस्तित्वात असलेली अनिष्ठ प्रथा आहे. हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेस आळा बसविण्याकरिता हुंडा प्रतिबंधक कायदा (अधिनियम) 1961 ची तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात शासनाने हुंडा प्रतिबंधक कायदा (अधिनियम) 1961 राजपत्र (भाग-4) अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी हुंडा प्रतिबंधक अधिकारी म्हणुन राज्यस्तर - आयुक्त महिला व बाल विकास पुणे, जिल्हास्तरावर - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तर तालुकास्तरावर - बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 
हुंडा प्रतिबंधक कायदा (अधिनियम) 1961 या कायद्याच्या विरोधात वर्तन करणाऱ्या व्यक्ती शिक्षेस पात्र असतील, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम. आर. गालफाडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: