अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 24 : क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
हिंगोली यांच्याव्दारे सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी युवक कल्याण विषयक कार्यक्रमाअंतर्गत
समाजसेवा शिबीर व स्वयं रोजगार शिबीर (सर्वसाधारण / विशेष घटक), क्रीडांगण विकास योजना
(सर्वसाधारण/विशेष घटक/आदिवासी), व्यायामशाळा
अनुदान (विशेष घटक/आदिवासी) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शैक्षणिक
संस्था, नोंदणीकृत क्रीडा मंडळे, युवा मंडळे, सेवाभावी संस्था, महिला मंडळे यांचेकडून
प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर योजनेचे विहित अर्ज क्रीडा निधी शुल्क भरुन
दि. 25 जुलै ते 2 ऑगस्ट 2017
या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सदर योजनेअंतर्गत परिपुर्ण प्रस्ताव सादर
करण्याचा अंतिम दिनांक 04 ऑगस्ट 2017 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र
संस्थांनी नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयास सादर करुन विहित अर्ज प्राप्त करावेत व परिपुर्ण
प्रस्ताव या कार्यालयास दि. 04 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर
करावेत. अपुर्ण प्रस्ताव व विहित मुदतीनंतर
आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. तरी अधिक माहितीसाठी संबंधितांनी
या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
No comments:
Post a Comment