गोवंर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थेनी अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 1 : राज्यात दि.
04 मार्च, 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 करण्यात आला
आहे. परिणामी, कालांतराने शेती व दुध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या
संख्येत वाढ होणार आहे. त्या अनुषंगाने दि. 1 मार्च, 2016 रोजी गोवंर्धन गोवंश सेवा
केंद्र सुरू करण्याची योजना आखली गेली आहे. गोरक्षणाचा अनुभव असलेल्या स्वयंसेवी संस्थामार्फत
ही योजना राबविण्यात येईल. यासाठी अशा संस्थाना गोरक्षण गोवंश रक्षा केंद्र एक रकमी
1 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
गोवंर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन
करण्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती : सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे
नोंदणीकृत असावी, संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत-कमी 3 वर्षाचा अनुभव असावा, केंद्रावर
असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण / चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे
स्वत:च्या मालकीची अथवा 30 वर्षाच्या भाडेपट्यावरची किमान 15 एकर जमीन असावी, संस्थेने
या योजनेंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 टक्के एवढे खेळतं भाग
- भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे, संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण
झालेले असणे आवश्यक आहे, संस्थेस गोसेवा/गो-पालनाचे कार्य करण्यासाठी शासनासोबत करारनामा
करण्याचे बंधनकारक राहील, संबंधीत संस्थेचे राष्ट्रीयकृत बॅकेत खाते असणे आवश्यक आहे,
संस्थेवर कार्यरत कर्मचारी / मजुर यांचे वेतन इत्यादीचा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी
संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी, या योजनेंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून
देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात
येणार नाही, ज्या संस्थांकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पनाचे
साधन आहे, अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल, राज्यस्तरावरील समितीची पुर्वपरवानगी
घेऊन केवळ नवीन मुलभूत सुविधा निर्माण करण्याकरिता सदर योजनेत रु. 1.00 कोटी इतके अनुदान
अनुज्ञेय राहील, राज्यस्तरावरील समितीची पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुलभूत सुविधा निर्माण
केल्यास अशा बाबीसाठी सदर योजनेत अनुदान मंजुर करण्यात येणार नाही.
सदरील
योजनेचे अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्या मार्फत सादर करण्यात
यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
*****
No comments:
Post a Comment