· जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा वृक्ष लागवडीस उत्स्फूर्त
प्रतिसाद
हिंगोली,(जिमाका)दि.5: ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून दरवर्षी 5 जून हा दिवस सर्वत्र साजरा
केला जातो. वृक्ष संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे, पर्यावरणाची गुणवत्ता
वाढविणे, पर्यावरण विषयक समस्याबाबत निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून
पोषक वातावरणांची निर्मिती करणे हा या जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य हेतू आहे. या
दिनाचे औचित्य साधून आज येथील जिल्हा परिषदेतील परिसरात वृक्ष लागवडीचे आयोजन
करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी
उस्फुर्त सहभाग घेत 1 हजार वृक्षाची लागवड केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश वाघ, कार्यकारी अभियंता (बांधकाम) लवेश तांबे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.
जावळे, शिक्षणाधिकारी
(प्राथ.) संदिपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. पावसे, जिल्हा कृषी
विकास अधिकारी निलेश कानवडे, कार्यकारी अभियंता (ल.पा.) चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) श्री. लाडे
आणि जिल्हा अभियान व्यवस्थापक (एमएसआरएलएम) जयराम मोडके यांच्यासह सर्व
अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
सर्व नागरिकांनी आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त किमान 3
वृक्ष लागवड करुन या उपक्रमास सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी
राधा बिनोद शर्मा यांनी यावेळी केले.
****
No comments:
Post a Comment