हिंगोली, (जिमाका)
दि.4 : अनुसूचित जमातीच्या
राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी विहित कालमर्यादेत जात
प्रमाणपत्राची वैधता तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत.
त्याअनुषंगाने मराठवाडा प्रशासकीय
विभागातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर प्रवेश घेण्यास
इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे जमात पडताळणी कार्यवाही विहित
कालमर्यादेत पूर्तता करण्याचा निर्णय समितीद्वारे घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी
वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या
राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या
प्रकरणी विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांच्या प्रवेशाची
कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासाठी
प्रथम प्राधान्याने जमात दावा पडताळणी कार्यवाही पूर्तता करण्यासाठी व
विद्यार्थ्यांची, पालकांची ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले
नाव, पत्ता व इतर आवश्यक माहितीसह विनंती अर्ज सहआयुक्त तथा उपाध्यक्ष , अनुसूचित
जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद या कार्यालयाच्या
tcscaur.mah@nic.in या ई-मेल पत्यावर सादर करण्यात यावा, असे आवाहन सहआयुक्त,
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे .
*******
No comments:
Post a Comment