·
जिल्ह्यातील 38 केंद्रावर लसीकरण सुरु.
हिंगोली, (जिमाका) दि.02: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने 16 जानेवारी पासून लसीकरणास प्रारंभ
केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ. राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरु आहे.
जिल्ह्यातील 38 केंद्रावर
दि. 31 मे पर्यंत 90 हजार 113 जणांना कोविशिल्डची लस तर 15 हजार 205 जणांना कोव्हॅक्सीनची
लस अशा एकूण एक लाख पाच हजार 318 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यामुळे हिंगोली
जिल्ह्याने लसीकरणामध्ये एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आजघडीला कोविशल्डची 6 हजार 300
व कोव्हॅक्सीनची 670 लसी शिल्लक असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. प्रेमकुमार
ठोंबरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयासह
उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हिंगोली येथील तीन खाजगी रुग्णालयात
प्रत्येक दिवशी कोरोना लसीकरण सुरु आहे. सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण
करण्यात येत आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच 18 ते 44 वर्षे वयाच्या
नागरिकांचे लवकरच लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने
दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केंद्रनिहाय
देण्यात आलेल्या कोविशील्ड लसीकरणाचा तपशील
असुन यामध्ये परिचारिका वसतीगृह जिल्हा रुग्णालय-9687, परिचारिका वसतीगृह जिल्हा रुग्णालय-990, प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सी (ना.)-2257, प्राथमिक
आरोग्य केंद्र फाळेगाव-2992, प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसम-1824, प्राथमिक आरोग्य केंद्र
भांडेगाव-3591, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी-3264, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी-964, प्राथमिक
आरोग्य केंद्र पोत्रा-2641, प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी-2170, प्राथमिक आरोग्य केंद्र
मसोड-2001, प्राथमिक आरोग्य केंद्र आखाडा बाळापूर-2946, प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा-2310,
प्राथमिक आरोग्य केंद्र रामेश्वर तांडा-2004, ग्रामीण रुग्णालय औंढा (ना.)-2350, ग्रामीण
रुग्णालय औंढा (ना.)-889, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरड शहापूर-2287, प्राथमिक आरोग्य
केंद्र जवळा बाजार-4803, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी-2533, प्राथमिक आरोग्य केंद्र
लोहरा-2556, उपजिल्हा रुग्णालय वसमत-3283, नागरी आरोग्य केंद्र वसमत-447, उपजिल्हा
रुग्णालय वसमत-784, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा-3008, प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा-3631,
प्राथमिक आरोग्य केंद्र हयातनगर-2441, प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभूर्णी-2709, प्राथमिक
आरोग्य केंद्र पांगरा शिंदे-2149, प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव-2278, ग्रामीण रुग्णालय
सेनगाव-2200, ग्रामीण रुग्णालय सेनगाव-710, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव-2840, प्राथमिक आरोग्य केंद्र कवठा- 3397, प्राथमिक आरोग्य
केंद्र साखरा-2285, प्राथमिक आरोग्य केंद्र कापडसिंगी-1903, एसआरपीएफ हिंगोली-660,
स्नेहल नर्सींग होम, हिगोली-235, माधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हिंगोली-14, नाकाडे हॉस्पिटल हिंगोली
येथे 80 असे एकूण 90 हजार 113 जणांना कोविशील्डची लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केंद्रनिहाय
देण्यात आलेल्या कोव्हॅक्सीन लसीकरणाचा तपशील
असुन यामध्ये परिचारिका वसतीगृह जिल्हा रुग्णालय-1550, परिचारिका वसतीगृह जिल्हा रुग्णालय-1434, प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सी (ना)-246, प्राथमिक
आरोग्य केंद्र फाळेगाव-438, प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसम-104, प्राथमिक आरोग्य केंद्र
भांडेगाव-140, उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी-794, प्राथमिक आरोग्य केंद्र पोत्रा-255,
प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोडी-212, प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड-228, प्राथमिक आरोग्य
केंद्र आखाडा बाळापूर-295, प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा-81, प्राथमिक आरोग्य केंद्र
रामेश्वर तांडा-166, ग्रामीण रुग्णालय औंढा (ना.)-234, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरड
शहापूर-209, प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बाजार-477, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळदरी-447,
प्राथमिक आरोग्य केंद लोहरा-462, उपजिल्हा रुग्णालय वसमत-518, नागरी आरोग्य केंद्र
वसमत-40, प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुंदा-270, प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा-330, प्राथमिक
आरोग्य केंद्र हयातनगर-202, प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभूर्णी-239, प्राथमिक आरोग्य
केंद्र पांगरा शिंदे-607, प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव-332, ग्रामीण रुग्णालय सेनगाव-122,
प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव-431, प्राथमिक
आरोग्य केंद्र कवठा- 417, प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा-215, प्राथमिक आरोग्य केंद्र
कापडसिंगी-151, एसआरपीएफ हिंगोली-66, स्नेहल नर्सींग होम, हिगोली-1100, माधव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हिंगोली-2069, नाकाडे हॉस्पिटल हिंगोली
येथे 324 असे एकूण 15 हजार 205 जणांना कोव्हॅक्सीनची लस देण्यात आली आहे.
अद्यापपर्यंत ज्या पात्र लाभार्थ्यांनी
लस घेतली नाही अशांनी वरीलपैकी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावी
असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment