परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि. 29 : आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन
निर्णयान्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी,
पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ
घेण्यासाठी अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज,
आवश्यक पात्रता, अटी व शर्ती इत्यादीची माहिती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत.
अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांनी
विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन दिनांक 30 जून, 2021 पर्यंत सादर करावेत, असे
आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment