09 June, 2021

रिक्षा चालकांनी सानुग्रह अनुदानासाठी आधार व भ्रमणध्वनी बँक खात्याशी संलग्न करुन ऑनलाईन नोंदणी करावी

 

·         रिक्षा संघटना, चालकांना मदत करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मदत कक्ष स्थापन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 09 : राज्य शासनाने रिक्षा परवाना धारकांना एक हजार पाचशे रुपयाचे सानुग्रह अनुदान जाहिर केले आहे. हे अनुदान रिक्षा परवाना धारकांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी रिक्षा चालकांनी www.transport.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

हे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करताना रिक्षा चालकांचा आधार क्रमांक हा त्यांच्या बँक खात्याशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना ऑनलाईन अर्ज करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ते अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

रिक्षा चालकांची आधारकार्डाशी संबंधित कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे आधार नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

रिक्षा संघटना, चालकांना आवश्यक मदत करण्यासाठी तसेच प्रणालीवर प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली मदत कक्ष (मो. क्र. 9021484105) स्थापन करण्यात आला आहे. सर्व परवाना धारक रिक्षा चालक, संघटना यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

*****


No comments: