25 June, 2021

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

 

हिंगोली, (जिमाका) दि.25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

श्री. मुंडे यांचे सोमवार, दि. 28 जून, 2021 रोजी दुपारी 1.15 वाजता कळमनुरी येथे आगमन होणार आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ: क्रेंबिज स्कूल, कळमनुरी), दुपारी 2.00 ते 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कळमनुरी येथे आगमन व राखीव, दुपारी 2.30 वाजता कै. राजीव सातव यांच्या निवासस्थानी भेट व राखीव, दुपारी 3.00 वाजता कळमनुरी येथून मोटारीने हिंगोलीकडे  प्रयाण करतील, दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथ आगमन व राखीव, दुपारी 4.00 ते 5.00 वाजता जिल्हास्तरीय समाजकल्याण विभागाचा आढावा घेतील (स्थळ : शासकीय विश्रामगृह, हिंगोली). सायंकाळी 5.00 वाजता हिंगोली जिल्हा कार्यकारिणीस उपस्थिती, सायंकाळी 5.45 वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत हिंगोली विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 6.30 वाजता दिलीप चव्हाण यांच्याकडे राखीव, सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व मुक्काम करतील.

****

No comments: