अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या
घटकातील
नवउद्योजकांसाठी राज्य शासनाची
‘मार्जिन मनी योजना’
·
लाभार्थ्यांना योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे
आवाहन
हिंगोली, (जिमाका) दि.21: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वी जयंती वर्ष
भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात साजरी करीत असतांना केंद्र शासनाने
सन-2015 मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ ही योजना घोषित केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र
राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन
मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या
लाभार्थी हिश्यामधील 15 टक्के मार्जिन मनी
उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द
घटकांतील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास
‘स्टँड अप इंडिया’ योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के
हिस्सा राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असून याकरीता लाभार्थ्यांनी खालील
अटी शर्ती चीपूर्तता करणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ ‘स्टँड अप इंडिया’
योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील सवलतीस
पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल, संबंधित लाभार्थ्यांने आयुक्त, समाज कल्याण पुणे
यांचे नावे अनुदानासाठी मागणीपत्र विहित विवरणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. तसेच उद्योग
आधार नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, आधार कार्ड, पॅन
कार्ड व बँक कर्ज खात्याचे विवरणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक पात्र व्यक्तींनी आपले
विहित नमुन्यातील प्रस्ताव तीन प्रतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयात सादर
करावे असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment