06 June, 2021

 


जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानूसार

नवीन महाराष्ट्र घडवूया

-         पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

हिंगोली, (जिमाका) दि. 06: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 17 व्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी अनेक लढाया व युध्दे लढून या महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्रातील सर्व जनतेला, नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्याविषयी, जिवनाविषयी माहिती व्हावी. तसेच महाराजांचे विचार, आदर्श, स्वराज्यप्रेम हे कायम जनतेच्या मनात राहावे हीच आपल्या सर्वांची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानूसार आपण नवीन महाराष्ट्र घडवूया, अशा शुभेच्छा संदेशाद्वारे पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी याप्रसंगी दिल्या .

येथील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारुन अभिवादन केले. यावेळी उपाध्यक्ष मनिष आखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व विचार व स्वराज्य प्रेम कायम जनतेच्या मनात राहावे यासाठी शासनाने आज दि. 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा उपक्रम नवीन पिढीला प्रेरणा देणारा आहे, असे सांगून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

याप्रसंगी राष्ट्रगीत घेण्यात आले व त्यानंतर महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, कार्यकारी अभियंता (बांधकाम) लवेश तांबे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जावळे,   शिक्षणाधिकारी (प्राथ.) संदिपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. पावसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी निलेश  कानवडे, कार्यकारी अभियंता  (ल.पा.) चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) श्री. लाडे तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

******

No comments: