गुणपत्रिका
संबंधित महाविद्यालयांमार्फत उपलब्ध
हिंगोली (जिमाका), दि. 7 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या डी.एल.एड.
जून-2026 परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता
परिषदेच्या www.mscepune.in संकेतस्थळावर
जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेचे आयोजन दि. 2 जून ते 10 जून 2026 या कालावधीत
करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना परीक्षेचे निकालाचे मूळ
गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच देण्यात येणार आहे.
तसेच उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळविण्यासाठी
अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.
24 ऑगस्ट 2026 असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने कळविले
आहे.
विद्यार्थ्यांनी
आपला निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहावा, असे आवाहन
करण्यात आले आहे. संबंधित अध्यापक विद्यालयांनी निकालाची माहिती
विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच उत्तरपत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी व छायांकित
प्रतीसाठी विहित मुदतीत अर्ज करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही
कळविण्यात आले आहे.
******
No comments:
Post a Comment