हिंगोली (जिमाका), दि. 7 : इतर मागासवर्ग (इमाव), विमुक्त जाती-भटक्या
जमाती (विजाभज) व विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) विद्यार्थ्यांसाठी शासकीय
वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत इयत्ता बारावीनंतर व्यावसायिक
तसेच अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश दिला
जातो. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने
राबविण्यात येणार आहे.
राज्यातील इमाव,
विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत
रिक्त असलेल्या जागांवर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या
विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बारावीनंतर उच्च
शिक्षण घेणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक
अभ्यासक्रमाकरिता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन
अर्ज करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी दि. 1 सप्टेंबर 2026
ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश
प्रणाली या ऑनलाइन पोर्टलवर दि. 7 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या
कालावधीत अर्ज भरावा. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे
संबंधित शासकीय वसतिगृहात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील इतर
मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी
शासकीय वसतिगृह योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर
मागास बहुजन कल्याण विभाग, हिंगोलीचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी
यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी गृहपाल,
मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली यांच्याशी संपर्क
साधावा.
*******
No comments:
Post a Comment