12 August, 2026

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त हिंगोलीत ‘रेड रन’ स्पर्धा उत्साहात संपन्न

 



हिंगोली(जिमाका), दि. 12 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी 5 किलोमीटर ‘रेड रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अकोला बायपास येथून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील ४२ युवक व १३ युवती अशा एकूण ५५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

युवक गटातील विजेते : प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर घोगरे (तोष्णीवाल महाविद्यालय, सेनगाव), द्वितीय, नारायण तोडकर (आदर्श महाविद्यालय, हिंगोली), तृतीय, वैष्णव जगताप (पठाडे महाविद्यालय, हिंगोली) यांनी मिळविला. संतोष लाखाडे (बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

युवती गटातील विजेते : प्रथम क्रमांक शुभांगी राठोड (शारदा आश्रमशाळा), द्वितीय सुहानी मोगले (बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली), तृतीय कोमल राठोड (बाबुराव पाटील महाविद्यालय, हिंगोली) यांनी मिळविला. विद्या शिंदे (राजमाता जिजाऊ महाविद्यालय, हिंगोली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.

विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पदक व अनुक्रमे २५०० रुपये, २००० रुपये आणि १५०० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. युवक व युवती गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘रेड रन’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुळे, रवी हणवते, गजानन आढे, प्रा. किशोर इंगोले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संजय पवार, टिना कुंदणानी, आशिष पाटील, बालाजी चापाकानडे, अब्दुल मुजीब आदींनी परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेतून युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम, शिस्त आणि एचआयव्ही/एड्स प्रतिबंधाबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

******





No comments: