नागरिक, संशोधक, विद्यार्थी व साहित्यप्रेमींनी नव्या संकेतस्थळांचा लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 7 : मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त
कार्यालयांची एकूण सात संकेतस्थळे महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार
नव्या स्वरूपात कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिक, संशोधक, अभ्यासक,
विद्यार्थी, साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या नव्या
संकेतस्थळांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे.
मराठी भाषा विभाग
तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती
मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास
संस्था यांच्या एकूण सात संकेतस्थळांच्या हस्तांतरणाची कार्यवाही महाराष्ट्र
शासनाच्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आली. या
प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार संकेतस्थळांसाठी
नवीन डोमेन निश्चित करण्यात आले आहेत.
संकेतस्थळांच्या
हस्तांतरणाच्या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत
असल्यामुळे संबंधित संकेतस्थळे काही कालावधीसाठी तात्पुरती अनुपलब्ध होती. आता
हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात
नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
नवीन
संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे :
1. मराठी भाषा विभाग
– https://marathi.maharashtra.gov.in
2. भाषा संचालनालय –
https://directorate-marathi.maharashtra.gov.in
3. राज्य मराठी विकास संस्था
– https://rmvs-marathi.maharashtra.gov.in
4. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
संस्कृती मंडळ – https://sahitya-marathi.maharashtra.gov.in
5. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश
निर्मिती मंडळ – https://marathivishwakosh.maharashtra.gov.in
6. विश्वकोश प्रथमावृत्ती (खंड 1 ते 20)
– https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in
7. मराठी परिभाषा कोश
– https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in
मराठी भाषा,
साहित्य, संस्कृती, विश्वकोश, परिभाषा तसेच विविध संदर्भसाहित्याशी संबंधित माहिती
नागरिकांना अधिक सुलभ व एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ही संकेतस्थळे उपयुक्त
ठरणार आहेत. या संकेतस्थळांद्वारे नागरिकांना विविध शासकीय माहिती, संदर्भसाहित्य
आणि मराठी भाषेशी संबंधित विविध उपयुक्त सामग्री सहज उपलब्ध होणार आहे.
सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक,
विद्यार्थी, साहित्यप्रेमी, शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधितांनी नव्या
संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन मराठी भाषा
विभागाने केले आहे.
No comments:
Post a Comment