13 August, 2026

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर

 


·         31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावयाचा असून, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे. प्राप्त अर्जांची छाननी दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org/ या ऑनलाइन संकेतस्थळावर दि. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयात विहित मुदतीत सादर करावीत.

जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रदीप धर्माधिकारी यांनी केले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी गुरुकुल, मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोली येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

*****

No comments: