पात्र व गुणवंत खेळाडूंनी निवड चाचणीत
सहभागी होण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 7 : महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा
प्रतिभा विकास केंद्र व खेलो इंडिया कुस्ती केंद्र, हिंगोली
यासाठी खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी तालुका क्रीडा संकुल,
हिंगोली येथे घेण्यात येणार आहे.
क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’ ही
धोरणात्मक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मैदानी क्रीडा प्रकारासाठी
कुस्ती जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र तालुका क्रीडा संकुल, हिंगोली येथे
सुरू करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’
योजनेंतर्गत कुस्ती या खेळाचे प्रशिक्षण केंद्रही हिंगोली येथे सुरू आहे.
या
केंद्रामध्ये निवड झालेल्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षणासोबतच क्रीडा साहित्य, अल्पोपहाराची सुविधा तसेच
क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून
देण्यात येणार आहे.
उपरोक्त जिल्हास्तरीय प्रशिक्षण
केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मैदानी क्रीडा प्रकारासाठी
मुले व मुली तसेच कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी मुलांसाठी ही निवड चाचणी दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी
घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील
पात्र व गुणवंत खेळाडूंना संबंधित क्रीडा प्रकारात प्रगत प्रशिक्षण देण्याच्या
उद्देशाने ही केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक
व पात्र खेळाडूंनी आपले आवेदनपत्र व
आवश्यक कागदपत्रांसह दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता तालुका क्रीडा संकुल,
हिंगोली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
खेळाडूंची पात्रता, निवड चाचणी व
इतर अधिक माहितीसाठी डॉ.
निलकंठ श्रावण, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी संपर्क साधावा,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आत्माराम
बोथीकर यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment