13 August, 2026

पालक मंत्री नरहरी झिरवाळ आजपासून दोन दिवस हिंगोली दौऱ्यावर

 


हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे उद्या शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी रात्री  8  वाजता नांदेड येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव तसेच मुक्काम राहणार आहे.

शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती राहील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरस्कार वितरण, जिल्हा ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच आरोग्य वर्धिनी बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.30 वाजता खेडेकर सुपर स्पेशालिटी ॲन्ड क्रिटीकल केअरच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, दुपारी 12 वाजता त्यांची वेळ शासकीय विश्रामगृह येथे राखीव असेल. त्यानंतर शिरडशहापूर येथे त्यांचे शासकीय वाहनाने दुपारी 1.30 वाजता आगमन होईल व 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सम्मान समारोहास उपस्थित राहतील. शिरड शहापूर येथून त्याचे शासकीय वाहनाने वारंगा फाट्याकडे प्रयाण होईल. पालकमंत्री श्री. झिरवाळ यांचे दुपारी 3 वाजता वारंगा फाटा येथे आगमन व कृषी विज्ञान केंद्रास भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता वारंगा फाटा येथून शासकीय वाहनाने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.

******

No comments: