05 August, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी तात्काळ पूर्ण करावी-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


हिंगोली (जिमाका), दि. 5 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने दि. 2 जून 2026 रोजी घेतला आहे. शासन निर्णयातील निकषानुसार या योजनेतील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांची ॲग्रिस्टॅक आधार क्रमांकावर आधारित शेतकरी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक आधार क्रमांकावर आधारित नोंदणी अद्याप झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून ॲग्रिस्टॅक नोंदणी नसलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. 

या अनुषंगाने तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांनी कृषी विभागाच्या समन्वयाने कॅम्पचे आयोजन करून शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र असलेल्या आणि अद्याप ॲग्रिस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून ॲग्रिस्टॅक नोंदणीची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******

No comments: