19 August, 2026

**छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महावॉकेथॉन**




**हिंगोली, दि. १९ (जिमाका) :** ‘जलसंधारण दिना’निमित्त हिंगोली शहरात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता **‘महावॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’**चे आयोजन करण्यात आले आहे. तीन किलोमीटर अंतराची ही महावॉकेथॉन शहरातील प्रमुख मार्गांवरून होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी केले आहे.


महावॉकेथॉनचा प्रारंभ सकाळी ६ वाजता **छत्रपती शिवाजी महाराज पुतळा** येथून होणार आहे. तेथून **जिल्हा परिषद प्रशाला मैदान – नवीन न्यायालय इमारत – जिल्हाधिकारी कार्यालय – पोलीस अधीक्षक कार्यालय – नांदेड नाका – इंदिरा गांधी चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – निर्मल कॅफे – पाण्याची टाकी – जिल्हा परिषद प्रशाला मैदान** असा महावॉकेथॉनचा मार्ग राहणार आहे. जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महावॉकेथॉनची सांगता होईल.


**‘पाणी हेच जीवन, पाणी हेच भविष्य’** तसेच **‘जलसंधारण करू, पाणी वाचवा’** हा संदेश महावॉकेथॉनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. माती व पाण्याचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसंधारणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


विद्यार्थी, युवक, अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी तसेच सर्व नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून **जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यास हातभार लावावा**, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: