05 March, 2025
अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी पशुपालन प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : पशुपालन क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान, प्रशिक्षण व शिक्षण केंद्र, पुणे आणि पशुसंवर्धन विभाग, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने सेनगाव येथील व्ही. के. देशमुख मंगल कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. बी. खुने, लातूर विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. आर.आर. चंदेल, परभणी येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. तुकाराम भुक्तार, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. ए. कलापुरे, सेनगावचे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. पी. एस. निचळ, समाज कल्याण विभागाचे श्री. एस. गोवंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. टी. के. भिसे, डॉ. साई पवार, डॉ. नूर शेख, डॉ. श्रीकांत देवकर, डॉ.अमोल भालेराव आणि डॉ. संघरत्न बहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी पशुपालन व्यवसायाच्या विविध संधी, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुमारे 600 शेतकरी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment