11 March, 2025
आरबीएसके कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहीम सुरु
• वंजारवाडा, गवळीपुरा, नरसी, भिंगी येथील बालकांची आज होणार तपासणी
हिंगोली (जिमाका), दि. 11 : आरबीएसके 2.0 कार्यक्रमांतर्गत हिंगोली तालुक्यात दि. 1 मार्च पासून अंगणवाडीतील बालकांची विशेष तपासणी मोहीम सुरु केली आहे.
हिंगोली तालुक्यात 4 पथके कार्यरत असून या पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम घेण्यात येत आहे. त्याचा संभाव्य कृती आराखडा पुढीलप्रमाणे आहे.
वरील चारही पथकामार्फत दि. 12 मार्च, 2025 रोजी वंजारवाडा, गवळीपुरा, नरसी, भिंगी येथील अंगणवाडी मध्ये बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. 13 मार्च रोजी संदर्भसेवा शिबीर, राजूरा, लासिना येथे, दि. 15 मार्च रोजी मस्तानशाह, भोईपुरा, करंजाळा तांडा, घोटा, नवखा येथील अंगणवाडी, दि. 17 मार्च रोजी मस्तानशाह, कमलानगर, आडगाव, सरकळी येथील अंगणवाडी, 18 मार्च रोजी मस्तानशाह, भोईपूरा, नरसी, एकंबा येथे, दि. 19 मार्च रोजी सिध्दार्थनगर, डिग्रस, लोहगाव येथे, दि. 20 मार्च रोजी महादेववाडी, जुना औंढा नाका, माळसेलू, लोहगाव येथे, दि. 21 मार्च रोजी संदर्भसेवा शिबीर, गिलोरी येथे, दि. 22 मार्च रोजी पोळा मारोती, सावरकर नगर, बोराळवाडी, भिंगी येथे, दि. 24 मार्च रोजी गवळीपुरा, शिवराज नगर, डिग्रस (क), हनवंतखेडा, जांभळून तांडा येथे, दि. 25 मार्च रोजी मस्तानशाह, खाजा कॉलनी, कडती, हिंगणी (मिनी), हिंगणी येथे, दि. 26 मार्च रोजी तालाबकट्टा, मोची गल्ली, बळसोंड व अनुपस्थित बालकांची तपासणी, दि. 27 मार्च रोजी पेन्शनपुरा व अनुपस्थित बालकांची तपासणी, दि. 28 मार्च रोजी संदर्भ सेवा शिबीर व अनुपस्थित बालकांची तपासणी आणि दि. 29 मार्च रोजी बावनखोली व अनुपस्थित बालकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील आरबीएसकेचे तालुका नोडल वैद्यकीय अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment