24 March, 2025

जिल्ह्यात जागतिक जल दिनानिमित्त जनजागृतीविषयक उपक्रमाचे नियोजन - मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

हिंगोली, दि.24 (जिमाका) : जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचे महत्व, वापर, हाताळणे याबाबत जनजागृती व्हावी याकरिता शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छता फेरी, गावकरी सहभागी स्वच्छता दिंडी, पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छता करणे, स्त्रोतांची क्लोरीनेशन प्रात्यक्षिक करणे आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी सांगितले. शनिवारी (दि. 22) जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जलसंवर्धन, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच पिण्याच्या पाण्याची जागा, पाणीपुरवठा करणारी यंत्रणा यांची साफसफाई करणे, तसेच शाळा अंगणवाडी परिसर स्वच्छता करणे, पाऊस पाणी संकलनासाठी नियोजन करणे, पाण्याचा साठा वाढविण्यासाठी गाव परिसरात पावसाचे वाहते पाणी आढळून जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून जल प्रतिज्ञा घेण्यात येत आहे. गावामध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध राहील. तसेच गावातील प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल. यासाठी ग्रामस्थांबरोबर नियोजन करावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संजय कुलकर्णी यांनी केले आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने ग्रामस्तरावर 100 टक्के गाव नळ जोडणी पूर्ण होऊन ‘हर घर जल’ ग्रामपंचायत घोषित करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत बैठक घेऊन मार्गदर्शन करावे. पाणी गुणवत्ता या मोहिमेअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षणबाबत तपासणी मोहीम राबवविणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत येथील टाक्या साफ करून घेणे. नळ जोडणी असल्याची खात्री करणे, ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता समिती समवेत लोक वर्गणी व पाणीपट्टी गोळा करणे, वैयक्तिक नळ जोडणी नोंदीबाबत गावस्तरावर आधार कार्ड गोळा करून ऑनलाईन नोंदी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिले. *******

No comments: