28 March, 2025

कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील बुधवारी हिंगोली दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 28 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 2 एप्रिल, 2025 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि. 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अमरावती येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामभवन हिंगोली येथे आगमन. 3.30 वाजता पिंपळखुटा ता.जि.हिंगोली येथे मृतक राजू साहेब गतांडे यांचे शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटुंबियास भेट. 4.30 वाजता तहसीलदार कळमनुरी यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणात कुटुंबियास भेट आणि सायंकाळी 6 वाजता नांदेडकडे प्रयाण करतील. *****

No comments: