07 March, 2025
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
• 11 मार्च रोजी भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर हिंगोली आणि कै. देवरावजी कल्याणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळमनुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कै. देवरावजी कल्याणकर माध्यचिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केंब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स कॅम्पस, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, कळमनुरी येथे दिनांक 11 मार्च 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा तथा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षण भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात शिवाजी महाविद्यालय हिंगोली, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय कामठा फाटा कळमनुरी, नारायण वाघमारे महाविद्यालय, आखाडा बाळापूर, रावसाहेब पतंगे महाविद्यालय वसमत, शिऊर साखर कारखाना वाकोडी ता.कळमनुरी, कपिश्वर सहकारी साखर कारखाना जवळा बाजार, टोकाई साखर कारखाना कुरुंदा, किर्ती ॲग्रोटेक एमआयडीसी हिंगोली, ओमप्रकाश देवडा पिपल्स को-ऑपरेटीव्ह बॅंक हिंगोली, जगतगुरु तुकाराम महाराज नागरी सहकारी पतसंस्था वसमत, शिवपार्वती पोल्ट्री फिड प्रा.लि. हिंगोली, दत्तगुरु फार्मर प्रोड्यूसर कंपनी कळमनुरी, धनंजय मोटार्स हिंगोली, भारत फायनान्स लि. हिंगोली, स्वतंत्र मायक्रोफायनान्स नांदेड, भारतीय जीवन बिमा निगम हिंगोली, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. हिंगोली (मायक्रो फायनान्स), भास्कर सर्व्हिस अॅंड सप्लायर प्रा.लि.पुणे इत्यादी आस्थापनांची 300 पेक्षा अधिक रिक्त पदे दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार कौशल्य विकास विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागाच्या योजनाची माहिती देण्याकरिता जिल्ह्यातील विविध महामंडळ स्टॉल लावून माहिती देणार आहेत,
कौशल्य विकास विभागाच्या www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन अर्ज करावेत आणि स्वतः मूळ कागदपत्रासह दिनांक 11 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता कै. देवरावजी कल्याणकर माध्यमिक व उच्च विद्यालय, केंब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स कॅम्पस, कळमनुरी येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे. या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment