27 March, 2025

पीसीपीएनडी कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रखरतेने अंमलबजावणी, कायद्याची माहिती व जनजागृती होण्याच्या दृष्टीने येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्रात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्राधिका-यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. तडस आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगाधर काळे, डॉ. नरवाडे, डॉ. सुनतकरी, डॉ. गणेश बन्ड्रेवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या राज्य प्रशिक्षक अनिता चव्हाण, सल्लागार समिती सदस्य अलका रणवीर, डापकूचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ज्ञानेश्वर चौधरी, प्रशांत गिरी, राजेंद्र खंदारे, इत्यादी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच एसएनसीयूचे डिईओ सुरेश शेवाळे यांनी सादरीकरणाद्वारे सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. सुकेशिनी ढवळे यांनी केले, तर सुरेश शेवाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल जाधव, अर्चना पवार, मदन पथरोड व नर्सिंग वसतीगृहातील विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. ******

No comments: