09 March, 2025
जागतिक महिला दिनानिमित्त पीसीपीएनडीटीबाबत जनजागृती
हिंगोली (जिमाका),दि.०९ : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय येथे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची जनजागृती करण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी जिल्ह्यामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी व महिलांमार्फत जनजागृती करून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना एक लाख रुपये बक्षीस योजनेची व हेल्पलाइनवर तक्रार दाखल कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले.
पीसीपीएनडीटी विभागाच्या ॲड. सुकेशिनी ढवळे यांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा व खबरी बक्षीस योजनेचा जास्तीत जास्त प्रसार करून कोठे गैरप्रकार होत असेल तर ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास डॉ.दीपक मोरे, स्त्रीरोग तज्ञ डॉ.पांडुरंग राठोड, डॉ.फैजल खान, मेट्रन चिंचकर, असिस्टंट मेट्रन आशा क्षीरसागर, आयुष डिपार्टमेंटच्या डॉ. विद्या देवकते, डॉ.सोनी अग्रवाल, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी सरस्वती कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment