26 March, 2025

माजी सैनिक महिलांनी भरतीचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली(जिमाका),दि.26: 136 इन्फट्री महार बटालियन टीए इको मध्ये माजी सैनिक तथा पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य वन विभागामधून स्वेच्छा सेवानिवृत्त घेतलेल्या महिलांसाठी दि. 21 एप्रिल ते 23 एप्रिल, 2025 या कालावधीत एसआरपीएफ कँप ग्राउंड धुळे सिटी, धुळे येथे भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. एमओईएफ आणि सीसी आणि राज्य वन विभागाचे सेवानिवृत्तांनी 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महार मध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. 21 एप्रिल ते दि. 23 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता एसआरपीएफ कँम्प ग्राउंड धुळे सिटी, धुळे येथे शारीरिक फिटनेस चाचणी सुरु होणार आहे. शिपाई जनरल ड्यूटीचे 44 पदे केवळ महाराष्ट्रातल्या माजी सैनिक तथा माजी सैनिक महिलांमधून भरण्यात येणार आहेत. तर लिपिक-6, स्वयंपाकी-01, हेयर ड्रेसर-01, मेसकीपर-01, स्टेवर्ड-01 आणि ब्लॅकस्मिथ-01 ही पदे संपूर्ण भारतातील माजी सैनिक क्लार्क किंवा माजी सैनिक ट्रेड्समेनमधून भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी अटी व पात्रता पाहून भरतीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास 9021208822 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments: