10 March, 2025
पाणलोट यात्रा पोहोचली बोथी व कुंभारवाडी गावात
हिंगोली (जिमाका), दि. 10 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार व मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रफुल्ल खिराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी तालुक्यातील मौजे-बोथी व कुंभारवाडी येथे पाणलोट (वाटरशेड) यात्रा घेण्यात झाली.
या पाणलोट (वाटरशेड) यात्रेचे गावातील महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गावात प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. पाणी की पाठशालामध्ये पाणलोटावर शाहीर धमांनद इंगोले यांनी विविध गिते व पथनाट्य सादर केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास यचावाड तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राच्या रोहिणी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक उगम ग्रामीण विकास संस्थेचे जयाजी पाईकराव हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोथीचे सरपंच मोहनराव बोथीकर हे होते.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, रोहिणी शिंदे, जयाजी पाईकराव, एमएसआरएलमच्या श्रीमती कटके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी महादेव कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहाय्यक स्वप्नील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प समन्वयक एच.आर.नाईक यानी मानले.
या कार्यक्रमात श्रमदान, वृक्ष लागवड, एनआरएम कामाचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पाणलोट योध्दा, धारणीताई व शालेय मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्राफीचे वितरीत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्वाना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला संतोष काळेगोरे, विनायक कोळेकर, कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व विविध स्वयंसेवी संस्थाचे अध्यक्ष, सचिव तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी, आत्मा बी टी, उमेदचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, आशाताई, गट समन्वयक, ग्रामपंचायत सरपंच व पाणलोट समिती सदस्य, ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, युवक, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment