05 March, 2025
मोफत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली आयोजित, महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (मैत्री) व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने अनूसचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी दि. 17 मार्च ते 30 एप्रिल, 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे 45 दिवशीय मोफत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मुलाखती दिनांक 12 मार्च, 2025 रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र,जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, हिंगोली येथे होणार आहेत. या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या उद्योग संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये थ्रीडी प्रिंटींग, सीएनसी मशीन ऑपरेटींग, फूड अँन्ड फ्रूट प्रोसेसिंग, सोलार पीव्ही टेक्नीशियन इत्यादी उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासोबतच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध व्यवसाय संधी, संवाद कौशल्य, शासकीय, निमशासकीय व इतर महामंडळच्या कर्ज व अनुदान योजना, बँकेची भूमिका, प्रकल्प अहवाल, मार्केटींग, व्यवसाय व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र लाभार्थीची निवड करण्यात येईल. हे प्रशिक्षण नियमितपणे उपस्थित राहून पूर्ण केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत दत्ता उचितकर (9960189358), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र व प्रकल्प अधिकारी (9765291785), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment